For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

icc world cup 2023: भारतीय संघासाठी मोठा धक्का! शुभमन गिलच्या खेळण्यावरच प्रश्नचिन्ह

02:56 PM Oct 06, 2023 IST | mahadev kamble
icc world cup 2023  भारतीय संघासाठी मोठा धक्का  शुभमन गिलच्या खेळण्यावरच प्रश्नचिन्ह
भारताचा सलामीवीर शुभमन गिल हा सध्या आजारी असल्यामुळे सामन्याआधीच संघाला मोठा धक्का बसला आहे.
Advertisement

Shubman Gill: भारतात वर्ल्ड कपला (icc world cup 2023) सुरुवात झाली आहे, मात्र त्याआधीच एक मोठा धक्का भारतीय टीमला बसला आहे. 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध (India vs Australia) सामना होणार आहे. मात्र त्याआधीच क्रिकेटर शुभमन गिलची डेंग्यू चाचणी पॉझिटिव्ह (Dengue test positive) आली आहे. त्यामुळे आता त्याच्या खेळाबद्दल सांशकता व्यक्त केली जात आहे.

Advertisement Whatsapp share

गिलवर उपचार सुरु

संघ व्यवस्थापन समितीकडून त्याच्या पुन्हा एकदा शुक्रवारी काही चाचण्या केल्या जाणार आहेत. त्यानंतरच त्याच्या खेळण्याविषयी निर्णय घेतला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याआधीच तो आजारी पडल्याने भारतासाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. तो सध्या आजारी असल्याने आता बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाकडून त्याच्यावर उपचार सुरु असून सध्या तरी कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.

Advertisement

हे ही वाचा >>“अजित पवार ज्यांच्या उरावर…”, उद्धव ठाकरेंचा शिंदेंच्या वर्मावर ‘बाण’

डेंग्यूच्या सर्व चाचण्या

चेन्नईमध्ये रविवारी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्याची भारतीय टीम जय्यत तयारी करत आहे. मात्र आता भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिलशिवाय भारतीय टीम मैदानात उतरण्याची शक्यता आहे. टीम इंडियाचा हा स्टार फलंदाज गुरुवारी एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या टीम इंडियाच्या नेट सेशनमध्येही सहभागी झाला नव्हता. त्यानंतर मात्र त्याच्या डेंग्यूबाबतच्या सर्व चाचण्या करण्यात आल्या आहेत.

Advertisement सब्सक्राइब करा

सलामी कोण करणार

सध्या त्याच्या डेंग्यूबाबतच्या चाचण्या केल्या जात असून आता पुन्हा एकदा त्याच्या चाचण्या केल्या जाणार आहेत. त्यामुळे त्या चाचण्यांची तपासणी करुनच शुभमन गिल खेळणार की नाही हे ठरणार आहे. शुभमन गिल ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला नाही, तर या सामन्यात टीम इंडियाची सलामी कोण करणार हा प्रश्न होता. मात्र या महत्वाच्या सामन्यात रोहित शर्मासोबत त्याच्या जागी इशान किशन उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर आणखी एक खेळाडू म्हणजे केएल राहुलदेखील आहे. कारण आशिया कपनंतर तो अगदी उत्तम फॉर्ममध्ये खेळला आहे. पण, गिल या सामन्यात खेळला नाहीच तर भारतासाठी हा मोठा धक्का असणार आहे.

 

Advertisement

 

View this post on Instagram

 

A post shared by Ꮪhubman Gill (@shubmangill)

शानदार फलंदाजी

शुभमन गिलने या वर्षाच्या सुरुवातीलाच न्यूझीलंडविरुद्ध शानदार द्विशतक झळकावले होते. वेस्ट इंडिज दौऱ्यातील खराब कामगिरी बाजूला ठेवून त्याने शानदार फलंदाजी केली होती.तर इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्येही तो शानदार असाच खेळला होता. त्यामुळेच तो सर्वाधिक 890 धावा करणारा फलंदाज ठरला होता. तर नुकत्याच झालेल्या आशिया कपमध्येही त्याने 302 धावा केल्या होत्या.

स्ट्राइक रेट

शुभमन गिलने 35 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने आतापर्यंत 66.10 च्या सरासरीने आणि 102.84 च्या स्ट्राइक रेटने 1917 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 6 शतके आणि 9 अर्धशतके आहेत. तसेच 11 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शुभमन गिलने 11 सामन्यांमध्ये 30.40 च्या सरासरीने 304 धावा केल्या आहेत. तर 18 कसोटी सामन्यांच्या 33 डावांमध्ये गिलने 32.20 च्या सरासरीने 966 धावा केल्या आहेत.

हे ही वाचा >> “त्या मस्तवाल खासदाराने…”, उद्धव ठाकरेंची शिंदे सरकारवर प्रश्नांची सरबत्ती

खेळाडूंचे पुनरागमन

सध्या जसप्रीत बुमराह, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर हे दुखापतीतून दीर्घकाळानंतर संघात त्यांचे पुनरागमन झाले आहे. आशिया चषकादरम्यानही फिरकीपटू अक्षर पटेलला दुखापत झाली होती. त्यावेळी त्याच्या जागी रविचंद्रन अश्विनला विश्वचषकात स्थान देण्यात आले होते.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज