IND vs SL : भारताकडून मुंबईत लंकादहन; सेमीफायनलमध्ये भारतीय टीमची धुमधडाक्यात 'एन्ट्री'
World Cup 2023: वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये भारताने तुफान खेळी करत भारतीय टीमने (Indian team) श्रीलंकेचा (Sri Lanka) तब्बल 302 धावांनी पराभव केला. त्यामुळे यंदाच्या वर्ल्डकपमधील भारताला सलग सातवा विजय मिळवता आला आहे. या विजयाबरोबरच भारतीय संघाने अगदी दिमाखात सेमी फायनल गाठली आहे. भारत यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सेमी फायनलमध्ये (Semi Final) प्रवेश करणारा भारतीय संघ हा पहिला संघ ठरला आहे. भारताने 14 गुणांसह गुणतालिकेतील आपले अव्वल स्थान पुन्हा एकदा निश्चित करत भारताने आपले स्थान पक्के केले आहे. भारतीय संघाचा आता पुढील सामना हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.
उपांत्य फेरीत भारतीय संघ पहिला
वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये भारताने श्रीलंकेविरूद्ध 357 धावा केल्या होत्या. तर भारताच्या प्रत्युत्तरदाखल श्रीलंकेचा डाव मात्र 55 धावामध्येच संपुष्टात आला. भारतीय संघाने गुरुवारी (2 नोव्हेंबर) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेचा पराभव करून आपली उत्कृष्ट कामगिरी दाखवून दिली आहे. वनडे वर्ल्ड कप 2023 च्या उपांत्य फेरीत पोहोचणारा भारतीय संघ हा पहिला संघ ठरला आहे.
हे ही वाचा >> Maratha Reservation: ’11 मुख्यमंत्र्यानी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत गोल-गोल फिरवलं’
श्रीलंका आऊट
श्रीलंका संघाला 358 धावा गाठताना 19.4 षटकामध्ये केवळ 55 धावांवरच मर्यादित राहावे लागले. भारताबरोबर झालेल्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव झाल्याने उपांत्य फेरीच्या शर्यतीतून आता या संघाला बाहेर पडावे लागले आहे. श्रीलंकेकडून कसून राजिताने 14, अँजेलो मॅथ्यूजने 12 आणि महिश तिक्षनाने 12 धावा केल्या होत्या. तर संघाच्या 5 फलंदाजांना साधे खातेही त्यांना खोलता आले नाही. तर भारताकडून मोहम्मद शमीने 5 आणि मोहम्मद सिराजने 3 बळी घेतले.
𝙄𝙉𝙏𝙊 𝙏𝙃𝙀 𝙎𝙀𝙈𝙄𝙎! 🙌#TeamIndia 🇮🇳 becomes the first team to qualify for the #CWC23 semi-finals 👏👏#MenInBlue | #INDvSL pic.twitter.com/wUMk1wxSGX
Advertisement— BCCI (@BCCI) November 2, 2023
गिलची 92 धावांची खेळी
या सामन्यात नाणेफेकीनंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 8 गडी गमावून 357 धावा केल्या होत्या. शुभमन गिलने सर्वाधिक म्हणजेच 92 धावांची खेळी खेळली. तर विराट कोहलीने 88 आणि श्रेयस अय्यरने 82 धावा केल्या. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंकाने 5 खेळाडूंचा बळी घेतला.