For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

IND vs AUS : फायनल सामन्यात शुभमन गिल स्वस्तात माघारी, सोशल मीडियावर झाला ट्रोल

04:51 PM Nov 19, 2023 IST | प्रशांत गोमाणे
ind vs aus   फायनल सामन्यात शुभमन गिल स्वस्तात माघारी  सोशल मीडियावर झाला ट्रोल
ind vs aus final 2023 shubman gil troll in social media india vs australia world cup 2023
Advertisement

Ind vs Aus Final,Shubman Gill out: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात फानयल सामना रंगलाय. या सामन्यात टीम इंडिया चांगलीच बॅकफुटवर गेली आहे. कारण एका मागून एक टीम इंडियाचे (Team India) विकेट पडले आहेत. टीम इंडियाच्या या अतिमहत्वाच्या सामन्यातील खराब कामगिरीनंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिल अवघ्या 4 धावा करून बाद झाला. त्यामुळे गिल स्वस्तात माघारी परतल्याने त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. (ind vs aus final 2023 shubman gil troll in social media india vs australia world cup 2023)

Advertisement Whatsapp share

ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारताला प्रथम फलंदाजीस उतरावे लागले होते. भारताकडून कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल मैदानात उतरले होते. टीम इंडियाकडून रोहित शर्माने डावाची चांगली सुरुवात केली होती. मात्र शुभमन गिलला त्याला चांगली साथ देता आली नाही. शुभमन गिल अवघ्या 4 धावावर बाद झाला. त्यामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते.

Advertisement

Advertisement

शुभमन गिल स्वस्तात बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. एका युझरने एक्स या सोशल माध्यमावर लिहले की, खुप वाईट वाटते आहे. गिलसाठी हे वर्ष चांगले नाही आहे.लव यु चॅम्पियन असे देखील युझरने म्हटले आहे.

तसेच राहुल गांधीचा एक प्रसिद्ध डायलॉगचा व्हिडिओ शेअर करून शुभमन गिलला ट्रोल करण्यात आले आहे.

दरम्यान या सामन्यात टीम इंडियाची बॅटींग लाईन पुर्ण कोलमडली आहे. शुभमन गिल 4 धावावर स्वस्तात आऊट झाला. रोहित शर्मा चांगली फलंदाजी करत होती. मात्र तो देखील 47 धावा करून आऊट झाला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या श्रेयस अय्यरही 4 धावावर बाद झाला. विराट कोहलीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण तो देखील अर्धशतक ठोकून बाद झाला. सध्या टीम इंडियाची अवस्था खूपच बिकट आहे. आता टीम इंडिया किती धावांचा डोंंगर उभारते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज