For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

IND vs AUS Final : भारत-ऑस्ट्रेलियात वर्ल्ड कपची फायनल लढत! खेळपट्टी आणि हवामान कसं आहे?

08:50 AM Nov 19, 2023 IST | प्रशांत गोमाणे
ind vs aus final   भारत ऑस्ट्रेलियात वर्ल्ड कपची फायनल लढत  खेळपट्टी आणि हवामान कसं आहे
ind vs aus world cup 2023 final weather forecast pitch report india vs australia final match
Advertisement

India vs Australia Weather Forecast, Pitch Report : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडीअमवर आज भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात वर्ल्ड कपचा महाअंतिम सामना रंगणार आहे. हा सामना जिंकून भारत तिसऱ्यांदा तर ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. या सामन्याची आता क्रिकेट फॅन्सना उत्सुकता आहे. दरम्यान आजच्या सामन्यात पावसाने अ़डथळा आणल्यास क्रिकेट फॅन्सची निराशा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अहमदाबादमधील हवामान कसे आहे? आणि नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे? हे जाणून घेऊयात.(ind vs aus world cup 2023 final weather forecast pitch report india vs australia final match)

Advertisement Whatsapp share

पावसाची शक्यता आहे का?

अहमदाबादमध्ये आज आकाश निरभ्र राहणार आहे. त्यामुळे पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे. वेदर फॉरकास्टनुसार, पावसाची शक्यता फक्त 1 टक्के आहे. त्यामुळे फायनल सामन्यात पुर्ण 50-50 ओव्हर्सचा खेळ होईल. तसेच तापमान 33 ते 19 डिग्री इतकं असू शकतं. सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये 10 ते 15 ताशी किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच पावसामुळे किंवा इतर काही कारणांमुळे सामना झाला नाही, तर राखीव दिवशी खेळ होईल. 20 नोव्हेंबर हा राखीव दिवस आहे.

Advertisement

हे ही वाचा : डेप्युटी एसपीच्या बायकोचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह…पोटच्या पोराचच भयंकर कृत्य

रिझर्व्ह डे ला रंगणार सामना

किती पाऊस पडला आणि सामना थांबला तर अंपायर्स त्याच दिवशी अंतिम सामना पूर्ण करण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करतात. यासाठी हा सामना किमान 20 ओव्हरचा तरी खेळता येईल असा प्रयत्न अंपायर्सचा असतो. पण जर तितक्याही ओव्हरचा सामना खेळवता येत नसेल तर तो राखीव दिवसावर ढकलला जातो. त्यामुळे हा सामना पावसामुळे रद्द झाल्यास तो सोमवारी 20 नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे.

Advertisement सब्सक्राइब करा

खेळपट्टी कशी आहे?

या स्टेडियमध्ये एकूण 11 खेळपट्टया आहेत. खेळपट्टीत जास्त बाऊंस आहे. ज्यामुळे वेगवान गोलंदाजांना मदत होईल. फलंदाजांसाठीही खेळपट्टी मदतशीर ठरेल. पहिले 10 ओव्हर निर्णायक ठरणार आहेत. या स्टेडियममध्ये आतापर्यंत 30 वनडे सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी 15 सामने हे पहिले बॅटिंग करणाऱ्या टीमने जिंकले आहेत. तर दुसऱ्या डावात बॅटिंग करणाऱ्या टीमने 15 सामने जिंकले आहेत. तसेच पहिल्या डावातील एव्हरेज स्कोअर हा 243 इतका आहे.

हे ही वाचा : Maratha Reservation : ‘…म्हणून तुम्हाला तुरंगवास भोगावा लागला’, जरांगे पाटलांचा भुजबळांवर पलटवार

Advertisement
Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज