For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

India vs Bangladesh : कोहलीने बांगलादेशचे स्वप्न मिळवले धुळीस! पुण्यात भारताचा मोठा विजय

09:42 PM Oct 19, 2023 IST | भागवत हिरेकर
india vs bangladesh   कोहलीने बांगलादेशचे स्वप्न मिळवले धुळीस  पुण्यात भारताचा मोठा विजय
257 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने दमदार सुरुवात केली. अवघ्या 41.3 षटकात 3 गडी गमावून सामना जिंकला.
Advertisement

India vs Bangladesh World Cup 2023 Match Result : भारताकडे यजमानपद असलेला एकदिवसीय विश्वचषक 2023 हळूहळू रोमांचक होत चालला आहे. दुसरीकडे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची घोडदौड कायम असून, भारताचा विजयरथ रोखण्याचे बांगलादेशचे स्वप्न विराट कोहलीने धुळीस मिळवले. भारताने विश्वचषक स्पर्धेत सलग चौथा विजय नोंदवला. बुधवारी (19 ऑक्टोबर) पुण्यात झालेल्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला. (Team India defeated Bangladesh by 7 wickets in the match played in Pune)

Advertisement Whatsapp share

बांगलादेशी संघही भारताचा विजय रथ रोखण्यात अपयशी ठरला. या विजयासह भारतीय संघ 8 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. बांगलादेशविरुद्धच्या शानदार विजयाचे नायक कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली ठरले. तिघांनीही सुरेख खेळी केली.

Advertisement

कोहलीचे शतक, गिलचीही शानदार खेळी

सामन्यात 257 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने दमदार सुरुवात केली. अवघ्या 41.3 षटकात 3 गडी गमावून सामना जिंकला. किंग कोहलीने 97 चेंडूत 103 धावांची नाबाद शतकी खेळी केली. तर शुभमन गिलने 55 चेंडूत 53 आणि रोहितने 40 चेंडूत 48 धावा केल्या.

Advertisement सब्सक्राइब करा

हे ही वाचा >> Vitthal Mandir: पत्राच्या घरात राहणाऱ्या महिलेने दान केले तब्बल 18 लाखांचे दागिने, कारण…

मधल्या फळीत श्रेयस अय्यरने 19 आणि केएल राहुलने 34 धावा केल्या. बांगलादेशच्या एकाही गोलंदाजाला भारतीय स्टार फलंदाजांवर दबाव टाकता आला नाही. ऑफस्पिनर मेहदी हसन मिराजने 2, तर वेगवान गोलंदाज हसन महमूदने 1 बळी घेतला.

भारतीय गोलंदाजांसमोर बांगलादेशच्या संघाने टागली नांगी

या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 8 गडी गमावून 256 धावा केल्या. बांगलादेशची सुरुवात चांगली झाली आणि पहिला धक्का 93 धावांवर बसला. यानंतर भारतीय गोलंदाजांनी दमदार पुनरागमन करत आपली धावसंख्या 4 विकेटच्या मोबदल्यात 137 धावांवर आणली. येथून मुशफिकुर रहीम आणि महमुदुल्लाह रियाझ यांच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे त्याला चांगली धावसंख्या गाठता आली.

Advertisement

हे ही वाचा >> Gadchiroli: सून आणि मामीने 5 जणांना कसा भरवला विषाचा घास?, मृत्यूच्या तांडवाची Inside Story

बांगलादेशकडून लिटन दासने सर्वाधिक ६६ (७ चौकार) आणि तनजीद हसनने ५१ (पाच चौकार, तीन षटकार) धावा केल्या. तर महमुदुल्लाहने 46 आणि रहीमने 38 धावा केल्या. भारतीय संघाकडून रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांनी 2-2 बळी घेतले. शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी 1 यश मिळाले.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज