For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

IND vs SA : जडेजाचा 'पंच', आफ्रिकेचं लोटांगण! 'इंडिया'ने असा साकारला अविस्मरणीय विजय

09:27 PM Nov 05, 2023 IST | भागवत हिरेकर
ind vs sa   जडेजाचा  पंच   आफ्रिकेचं लोटांगण   इंडिया ने असा साकारला अविस्मरणीय विजय
भारताचा दक्षिण आफ्रिकेवर मोठा विजय, विराट कोहली, रवींद्र जडेजा ठरले विजयाचे शिल्पकार.
Advertisement

India vs South Africa world cup 2023 : विराट कोहलीचं अविस्मरणीय शतक, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमीने केलेल्या गोलंदाजीच्या बळावर भारताना दक्षिण आफ्रिकेचा अवघ्या 83 धावांत खुर्दा उडवला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला विश्वचषकात भारताविरुद्ध 243 धावांनी वनडे क्रिकेटमधील सर्वात मोठा पराभव पत्करावा लागला. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच दक्षिण आफ्रिकेचा संघ 83 धावांच्या इतक्या कमी धावसंख्येवर सर्वबाद झाला. (India defeated South Africa by 243 runs in world cup 2023)

Advertisement Whatsapp share

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने आपली विजयी मोहीम सुरू ठेवली आणि दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत आठव्या विजयांसह 16 गुणांसह अव्वल स्थान पटकावले. त्यामुळे उपांत्य फेरीच्या यादीत भारत पहिल्या स्थानावर राहणार आहे. पाकिस्तानने न्यूझीलंडवर विजय मिळवल्याने दक्षिण आफ्रिकेचा संघही उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. आता भारताचा साखळी फेरीतील शेवटचा सामना नेदरलँडशी होणार आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा शेवटचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे.

Advertisement

दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ 40 धावांत परतला तंब्बूत

भारताने दिलेल्या 327 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज भारताच्या गोलंदाजीचा सामना करण्यात सपशेल अपयशी ठरले. डावाच्या 14व्या षटकापर्यंत दक्षिण आफ्रिकेने 40 धावांत 5 विकेट गमावल्या होत्या. ज्यात शमी आणि जडेजाने प्रत्येकी दोन तर सिराजने एक विकेट घेतली.

Advertisement सब्सक्राइब करा

हे ही वाचा >> Virat Kohli : किंग ‘कोहली’ सचिन तेंडुलकरच्या पंक्तीत, बॅट तळपली घडवला ‘विराट’ इतिहास!

क्विंटन डी कॉक (5 धावा), रॅसी व्हॅन डर ड्युसेन (13 धावा), टेंबा बावुमा (11 धावा), अॅडम मार्कराम (9 धावा) आणि हेनरिक क्लासेन (1 धाव) हे दक्षिण आफ्रिकेचे आघाडीचे फंलदाज स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यानंतर भारताने सहज सामना खिशात घातला.

दक्षिण आफ्रिकेची 83 धावांपर्यत मजल

40 धावांत 5 विकेट्स गमावल्यानंतरही दक्षिण आफ्रिकेचा संघ जडेजाचा मारा सहन करू शकला नाही आणि जडेजाने प्रथम डेव्हिड मिलर (11) आणि नंतर केशव महाराज (7) यांना क्लीन बोल्ड केले. यानंतर दक्षिण आफ्रिकेचे फंलदाज फार काळ तग शकले नाही आणि संपूर्ण संघ 27.1 षटकात केवळ 83 धावा करून सर्वबाद झाला.

Advertisement

दक्षिण आफ्रिकेला विश्वचषकाच्या इतिहासात 243 धावांनी सर्वात मोठा पराभव स्वीकारावा लागला. जडेजाने सर्वाधिक पाच विकेट्स घेत भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला, तर शमी आणि कुलदीपने प्रत्येकी दोन आणि सिराजनेही एक विकेट घेत त्याला चांगली साथ दिली.

भारताला सुरुवातीलाच बसले दोन धक्के

कोलकात्यात नाणेफेक जिंकल्यानंतर भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा योग्य निर्णय घेतला. रोहित शर्माने सुरुवातीला आक्रमक सुरुवात केली. मात्र, डावाच्या सहाव्या षटकात त्याने 24 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांसह 40 धावांवर खेळत असतानाच तो बाद झाला.

यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहलीने डाव पुढे नेला. मात्र डावाच्या 11व्या षटकात 24 चेंडूत चार चौकार आणि एका षटकारासह 23 धावा करून गिल केशव महाराजच्या फिरकीत अडकला. पहिल्या 10 षटकांनंतर कोलकात्याच्या खेळपट्टी बदलली आणि दक्षिण आफ्रिकेचे फिरकीपटू वरचढ ठरू लागले.

कोहली आणि अय्यर यांनी केली 134 धावांची भागीदारी

कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी फिरकीपटूंना साथ देणाऱ्या खेळपट्टीवर पाय रोवले आणि धावफलक हलता ठेवला. त्यामुळे दक्षिण आफ्रिका बॅकफूटवर गेली. कोहली आणि अय्यर यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 134 धावांची भागीदारी झाली. त्यानंतर अय्यर 87 चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांसह 77 धावा करून लुंगी अँगिडीचा बळी ठरला. अय्यर गेल्यानंतर कोहलीने एका बाजूने जबाबदारीने फंलदाजीने सुरूच ठेवली.

कोहलीने वाढदिवसाच्या दिवशी झळकावले शतक

अय्यर बाद झाल्यानंतर केएल राहुल लगेचच 8 धावा करून पॅव्हेलियनमध्ये गेला, पण सूर्यकुमारने मैदानात येताच आक्रमक शैली स्वीकारली. तर कोहली त्याला साथ देत होता. पण, सूर्यकुमार 14 चेंडूत 5 चौकारांसह 22 धावा करून बाद झाला आणि शेवटी जडेजाने कोहलीला साथ दिली.

हे ही वाचा >> दरवाजा उघडायला केला उशीर अन् मुलांसमोरच पत्नीवर सपासप वार, जागेवरच सोडला जीव

जडेजा मैदानात आल्यानंतर कोहलीने 49 वे शतक झळकावले आणि सचिन तेंडुलकरच्या वनडे कारकिर्दीतील 49 वे शतकांची बरोबरी केली. कोहली नाबाद राहिला आणि त्याने 121 चेंडूत 10 चौकारांसह 101 धावा केल्या. जडेजाने 15 चेंडूंत तीन चौकार आणि एक षटकारासह झटपट 29 धावा केल्या. त्यामुळे भारताने 50 षटकांत 5 गडी गमावून 326 धावा केल्या.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज