For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

INDvsAUS World Cup 2023 Final: भारतीयांच्या स्वप्नांचा चुराडा, हाता-तोंडाशी आलेलं विश्वविजेतेपद कांगारूंनी हिसकावलं!

09:34 PM Nov 19, 2023 IST | रोहित गोळे
indvsaus world cup 2023 final  भारतीयांच्या स्वप्नांचा चुराडा  हाता तोंडाशी आलेलं विश्वविजेतेपद कांगारूंनी हिसकावलं
विश्वचषक 2023 फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा भारतावर मोठा विजय
Advertisement

IND vs AUS LIVE Score, World Cup 2023 Final, India vs Australia: क्रिकेट वर्ल्डकप 2023 च्या अंतिम सामन्याता टीम इंडियाला अत्यंत साधारण कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियासमोर पराभव पत्करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेडच्या शानदार शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने तब्बल सहाव्यांदा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे. 6 गडी राखून ऑस्ट्रेलियाने विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकत भारताला पराभवाची धूळ चारली. दरम्यान, नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. पण कर्णधार रोहित शर्मा बाद झाल्यानंतर एकाही फलंदाजाला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे भारताचा संपूर्ण संघ केवळ 240 धावाच करू शकला. (india vs australia live score icc world cup 2023 final updates ind aus rohit sharma pat cummins virat kohli ahmedabad australia defeated india by 6 wickets won world cup for sixth time)

Advertisement Whatsapp share

या सामन्यात भारतीय फलंदाज अत्यंत धीम्या गतीने खेळले. ज्यामुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. यावेळी केएल राहुलने 107 चेंडूत 66 धावांची संथ खेळी तर विराट कोहलीने 63 चेंडूत 54 धावांची खेळी खेळली. या दोघांशिवाय इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही.

Advertisement

हे ही वाचा>> Ind vs Aus World Cup Final LIVE : टीम इंडिया ऑलआऊट! ऑस्ट्रेलियासमोर 241 धावांचे आव्हान

कर्णधार रोहित शर्माने 31 चेंडूत 47 धावा केल्या होत्या. तर सूर्यकुमार यादवने 28 चेंडूत केवळ 18 धावा केल्या. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन संघाकडून मिचेल स्टार्कने 3 बळी घेतले. तर पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूडने 2-2 गडी बाद केले.

Advertisement सब्सक्राइब करा

भारताने 241 धावांचं लक्ष्य समोर ठेवलेलं असताना ट्रॅव्हिस हेडने शानदार शतक झळकावलं. त्याने केवळ 95 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. यादरम्यान त्याने 14 चौकार आणि 1 षटकार लगावला.

भारतीय संघाने सलग 10 सामने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळे भारतीय संघ तिसऱ्यांदा विश्वचषक पटकावेल अशीच सर्व भारतीयांची आशा होती. मात्र, ऑस्ट्रेलियन संघाच्या अत्यंत दमदार कामगिरीमुळे कर्णधार रोहित शर्माच्या हाता-तोंडाशी आलेला विश्वचषकाच्या विजयाचा घास त्याला गमवावा लागला.

Advertisement

हे ही वाचा>> Ind vs Aus Final : टॉस जिंकूनही का केली नाही प्रथम फलंदाजी? कमिन्सने सांगितलं कारण

टीम इंडियाने आतापर्यंत फक्त दोनदा म्हणजे 1983 आणि 2011 मध्ये वर्ल्ड कप जिंकला आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत तब्बल 5 वेळा विजेतेपद पटकावले आहे.

ऑस्ट्रेलियासमोर 241 धावांचे लक्ष्य

भारताने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 241 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. भारतीय संघाने 50 षटकांत सर्व गडी गमावून 240 धावा केल्या. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. पण सतत विकेट पडल्यानंतर दबाव वाढला. ज्यामुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाने या सामन्यात अतिशय सहजपणे विजय मिळवला.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज