For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

World Cup Final : पॅलेस्टाईन समर्थक सुरक्षा भेदून मैदानात घुसला, कोहलीच्या खांद्यावर हात टाकला अन्...

04:24 PM Nov 19, 2023 IST | mahadev kamble
world cup final   पॅलेस्टाईन समर्थक सुरक्षा भेदून मैदानात घुसला  कोहलीच्या खांद्यावर हात टाकला अन्
भारताकडून धावांसाठी प्रयत्न सुरु असतानाच मैदानात अचानक एक प्रेक्षक घुसला, आणि त्याने त्यावेळी विराट कोहलीच्या जवळ जात पाठीमागून जात त्याला पकडले.
Advertisement

Palestine Fans in World Cup Final: भारतात आजव वनडे वर्ल्ड कप 2023 होत असल्याने भारतीयांसाठी आजचा दिवस खास आहे. कारण अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND Vs Aus) यांच्यामध्ये सामना होत आहे. या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने 81 धावा असतानाच 3 विकेट गमावले होते.

Advertisement Whatsapp share

मैदानात आला प्रेक्षक

भारताचे तीन गडी बाद झाल्यानंतर विरोट कोहली आणि केएल राहुल यांनी मिळून भारताची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. भारताकडून धावांसाठी प्रयत्न सुरु असतानाच मैदानात अचानक एक प्रेक्षक घुसला, आणि त्याने त्यावेळी विराट कोहलीच्या जवळ जात पाठीमागून जात त्याला पकडले.

Advertisement

हे ही वाचा >> Bhujbal Vs Damania : घर लाटल्याच्या दमानियांच्या आरोपांवर भुजबळांचं उत्तर, फर्नांडिस प्रकरण नेमकं काय?

पॅलेस्टाईन समर्थक

विराट कोहलीला त्याने पकडल्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यानी त्याला पकडले तेव्हा तो पॅलेस्टाईन समर्थक असल्याचे स्पष्ट झाले. यावेळी त्याने पॅलेस्टाईनचाच मास्कही घातला होता. 14 वे षटकातील तिसरा बॉल टाकल्यानंतर ही घटना घडली. त्यानंतर मात्र सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून बाहेर काढले.

Advertisement सब्सक्राइब करा

व्हिडीओ व्हायरल

मैदानात ही घटना घडल्यानंतर मात्र या घटनेचा व्हिडीओ आणि फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत. या घटनेदरम्यान विराट कोहली 29 धावांवर तर केएल राहुल 6 धावांवर खेळत होता. तर हे 14 वे षटक फिरकी गोलंदाज ॲडम झम्पा टाकत होता. या सामन्याच्या आधीपासूनच हमास आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू झाल्याचे आणि काही भयंकर घटना घडल्याचे समोर आले होते.

हे ही वाचा >> IND vs AUS: भारताची प्लेईंग 11… World Cup 2023 Final मध्ये रोहित शर्माने कोणा-कोणाला दिली संधी?

Advertisement
Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज