For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Asian Games: चीनच्या भूमीत भारताचा इतिहास! सुवर्ण पदकांची केली लयलूट

10:20 AM Oct 07, 2023 IST | mahadev kamble
asian games  चीनच्या भूमीत भारताचा इतिहास  सुवर्ण पदकांची केली लयलूट
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी 100 सुवर्ण पदकांची कमाई करत देशाच्या नावावर वेगळा इतिहास रचला आहे.
Advertisement

Asian Games: आशियाई स्पर्धेत भारताने अब कि बार म्हणत 100 पार करत सुवर्ण पदकांची (gold medal) लयलूट केली. चीनमधील हांगझोऊ येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या (Indian player) या यशामुळे भारतान नवा इतिहास रचला आहे. या स्पर्धेतील खेळाडूंनी अनेक खेळात मिळवलेल्या यशामुळे ही पदकांची संख्या आणखी ही वाढण्याची शक्यता आहे. खेळाडूंच्या अतुलनीय खेळामुळे हांगझोऊमध्ये नवा इतिहास रचला आहे.

Advertisement Whatsapp share

कबड्डी संघाचे शंभरावे सुवर्ण

भारताच्या मुलींच्या संघाने कबड्डीमध्ये आज सुवर्णपदक जिंकत देशाला 100 वे पदक प्राप्त करुन दिलेय यापूर्वी जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने 70 पदकं जिंकली होती. हांगझोऊमध्येही सर्वच प्रकारातील खेळाडूंची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. देशाच्या खेळाडूंनी सुवर्ण पदकांची लयलूट केल्यामुळे चीनमध्ये देशाचा तिरंगा अभिमानाने उंचावला आहे.

Advertisement

हे ही वाचा >>‘बॉलीवूड’मध्ये अंडरवर्ल्डचा पैसा, महादेव बेटिंग प्रकरणात ईडीची मोठी कारवाई

तिरंदाजीमध्ये अव्वल

आशिया स्पर्धेतील आजच्या 14 व्या दिवशीच भारताने 100 पदकं जिंकली आहेत. यामध्ये 25 सूवर्ण, 35 रजत आणि 40 कांस्य पदकांचा समावेश आहे. तिरंदाजीमध्ये भारताच्या ज्योती वेन्नमने सुवर्ण पदक प्राप्त केले असून अदिती स्वामीने कंपाऊंड तिरंदाजीमध्ये कांस्य पदक पटकावले आहे. या दोन पदकांच्या बळावरच भारताने पदकांच्या बाबतीत शंभरी पार केली आहे.

Advertisement सब्सक्राइब करा

पदकांची लूट

आशियाई स्पर्धेत भारताकडून आज तीन सुवर्ण, एक रजत आणि एक कांस्य पदकांची कमाई करण्यात आली आहे. आदिती स्वामीने कंपाऊंड तिरंदाजीत कांस्य तर ज्योती वेन्नम आणि ओजस देवताळे यांनी कंपाऊंड तिरंदाजीत प्रत्येकी एक सूवर्णपदक मिळवले आहे. अभिषेक वर्माने कंपाऊंड तिरंदाजीमध्ये रजत पदक मिळवून भारताची शान वाढवली आहे. तर महिला कबड्डी टीमनेही सूवर्ण पदकांची कमाई करून भारताचा तिरंगा फडकवत ठेवला आहे. खेळाडूंच्या या यशामुळे त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

तिरंदाजीमध्ये सुवर्णपदक

ज्योती वेण्णम आणि ओजस देवतळे या खेळाडूंनी 4 ऑक्टोबर रोजी, भारतीय कंपाउंड तिरंदाजीमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. त्यांच्या या यशस्वी कामगिरीमुळे भारताच्या एकूण पदकांचा आकडा 70 पार केला होता. भारताच्या खेळाडूंनी मिळवलेल्या यशामुळे भारताने 2018 मध्ये जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत केलेला 70 पदके जिंकण्याचा विक्रम मागे टाकला आहे. जकार्तामध्ये भारताने 16 सुवर्ण, 23 रौप्य, 31 कांस्य अशी एकूण 70 पदकं जिंकली होती.

Advertisement

हे ही वाचा >> खुर्चीला हात-पाय बांधून गळा आवळला, संभाजीनगरात 70 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या

1951 मध्ये भारत सरस

1951 मध्ये भारताची राजधानी दिल्ली येथे पहिल्या आशियाई खेळांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर भारताने 15 सुवर्ण, 16 रौप्य आणि 20 कांस्य अशी एकूण 51 पदकं जिंकली होती. 15 सुवर्णपदके जिंकणे ही भारतासाठी त्यावेळी अप्रतिम कामगिरी होती. आशियाई क्रीडा स्पर्धेत 15 सुवर्णपदके जिंकण्याचा भारताचा विक्रम दीर्घकाळ अबाधित राहिला होता. भारताने एकामागून एक अनेक आशियाई खेळ खेळले, परंतु 15 सुवर्ण जिंकण्याचा विक्रम कायम राहिला.

जकार्तापेक्षाही मोठं यश

1982 मध्ये, जेव्हा भारताने पुन्हा एकदा आशियाई खेळांचे यजमानपद भूषवले होते तेव्हाही भारत हे सुवर्णपदकांचा विक्रम करण्याच्या तयारीत होता. त्या वर्षी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने 13 सुवर्ण, 19 रौप्य आणि 25 कांस्य अशी एकूण 57 पदकं जिंकली होती. त्यावेळी भारतीय संघ सुवर्ण पदक मिळवण्यात मागे राहिला होता. त्यानंतर 2018 मध्ये जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने मागील सर्व विक्रम मोडीत काढले आणि 16 सुवर्णांसह एकूण 70 पदके जिंकली होती.

हे ही वाचा >>NCP: निवडणूक आयोगात असं काय घडलं की जितेंद्र आव्हाड रडले?, रोहित पवारही आक्रमक

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज