For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Mohammed Shami : वानखेडेवर शमीच्या गोलंदाजीचे वादळ, 7 विकेट्स घेत मोठा रेकॉर्ड

11:19 PM Nov 15, 2023 IST | प्रशांत गोमाणे
mohammed shami   वानखेडेवर शमीच्या गोलंदाजीचे वादळ  7 विकेट्स घेत मोठा रेकॉर्ड
mohammed shami picks 7 wicket against new zealand semi final wankhede stadium team india reach final odi world cup 2023
Advertisement

Mohammed Shami picks 7 wicket New zealand Record : वानखेडेवर रंगलेला न्युझीलंड (New zealand) विरूद्धचा सेमी फानयल सामना टीम इंडियाने (Team india) 70 धावांनी जिंकला. या सामन्यात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने उत्कृष्ट गोलंदाजी केली. मोहम्मद शमीने एकट्याने न्यूझीलंडच्या 7 विकेट घेतल्या. या त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या बळावर आता टीम इंडियाने वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. यासोबत मोहम्मद शमीने 7 विकेट मोठा रेकॉर्डही केला आहे. हा रेकॉर्ड काय आहे तो जाणून घेऊयात. (mohammed shami picks 7 wicket against new zealand semi final wankhede stadium team india reach final odi world cup 2023)

Advertisement Whatsapp share

मोहम्मद शमीने या स्पर्धेत तीनदा 5-5 विकेट घेत वनडे वर्ल्ड कपमध्ये 50 विकेट पुर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. शमीने केवळ 17 एकदिवसीय सामने खेळताना 51 विकेट्स घेतल्या आहेत. यासोबतच शमीने वर्ल्ड कप वनडेमध्ये 5 विकेट घेण्याची ही चौथी वेळ आहे.

Advertisement

हे ही वाचा : Video : सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांच औक्षण, काटेवाडीतली भाऊबीज पाहिलीत का?

भारताने इंग्लंडसमोर 397 धावांचा डोंगर उभा केला होता. मोहम्मद शमीने सुरुवातीच्या दोन्ही विकेट घेत न्यूझीलंडच्या टॉप ऑर्डरचे कंबरडे मोडले. त्याने डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्रला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर केन विल्यमसन आणि डेरेन मिचेलमध्ये मोठी पार्टनरशीप झाली. ही पार्टनरशीप तुटण्याचे नावच घेत नव्हती. त्यानंतर रोहितने शमीला पुन्हा गोलंदाजीची संधी दिली. आणि शमीने केन विल्यमसन आणि टॉम लॅथमला लागोपाठ दोन चेंडूंवर बाद केले. यानंतर शमीने डॅरेल मिशेल, टीम साऊथी आणि लॉकी फर्ग्युसन यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवून भारताचा शानदार विजय निश्चित केला.

Advertisement सब्सक्राइब करा

हे ही वाचा : Virat kohli : ‘तेव्हा तुझी सगळे मस्करी….’, ‘विराट’ कामगिरीनंतर सचिन तेंडुलकर भारावला, ड्रेसिंग रूममधला सांगितला किस्सा?

दरम्यान टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय टीम इंडियाने यशस्वी करून दाखवला. विराट कोहलीच्या ऐतिहासिक 117 धावा, श्रेयस अय्यरची ताबडतोड 105 धावांची शतकी खेळी आणि शुभमन गिलची नाबाद 80 धावाची खेळी या बळावर टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 397 धावांचा डोंगर उभारला होता. त्यामुळे न्युझीलंडसमोर जिंकण्यासाठी 398 धावांचे होते.

Advertisement
Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज