For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

SA vs Ned : अविश्वसनीय! नेदरलँडचा सर्वात मोठा धमाका, आफ्रिकेला लोळवलं

08:29 AM Oct 18, 2023 IST | भागवत हिरेकर
sa vs ned   अविश्वसनीय  नेदरलँडचा सर्वात मोठा धमाका  आफ्रिकेला लोळवलं
नेदरलँड क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विश्वचषक 2023 मधील सर्वात मोठा धमाक केला.
Advertisement

South Africa vs Netherlands Odi : नेदरलँड क्रिकेट संघाने इतिहास रचला. २०२३ च्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचा 38 धावांनी पराभव केला. धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये 14व्या क्रमांकावर असलेल्या नेदरलँड संघाने या स्पर्धेतील सर्वात मोठी कामगिरी केली. आयसीसी क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेची बाद फेरीच्या सामन्यांपूर्वीच दमछाक झाल्याचं दिसलं. 246 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ 207 धावांवरच गारद झाला. त्याच्या पराभवाची स्क्रिप्ट एकेकाळी दक्षिण आफ्रिकेकडून खेळलेल्या रॉल्फ व्हॅन डर मर्वेने लिहिली होती. त्याने टेम्बा बावुमा आणि रॅसी व्हॅन डर डुसेनच्या दोन मोठ्या विकेट घेतल्या.

Advertisement Whatsapp share

तत्पूर्वी, स्कॉट एडवर्ड्सच्या कर्णधार खेळीमुळे नेदरलँड्सने आठ गडी गमावून 245 धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली. त्याने 69 चेंडूत 10 चौकार आणि 1 षटकारासह 78 धावांची नाबाद खेळी खेळली आणि संघाला सात विकेट्सवर 140 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यांच्याशिवाय 10व्या क्रमांकाचा फलंदाज आर्यन दत्तने नऊ चेंडूत तीन षटकारांसह 23 धावांची नाबाद खेळी केली आणि रुल्फ व्हॅन डर मर्वेने 29 धावा काढल्या. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जॉन्सन, कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. पावसामुळे खेळ उशिरा सुरू झाला, त्यामुळे सामना 43 षटकांचा करण्यात आला.

Advertisement

नेदरलँडचा विश्वचषकातील तिसरा विजय

विश्वचषकाच्या इतिहासात नेदरलँडचा हा केवळ तिसरा विजय आहे. दक्षिण आफ्रिकेला पराभूत करण्यापूर्वी, त्यांना पाच विश्वचषक स्पर्धा आणि 22 सामन्यांमध्ये केवळ नामिबिया आणि स्कॉटलंडचा पराभव करता आलेला आहे. नेदरलँड संघाने क्वालिफायर खेळून 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत प्रवेश मिळवलेला आहे. त्यांनी वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेसारख्या मोठ्या संघांना पराभूत केले होते.

Advertisement सब्सक्राइब करा

हेही वाचा >> मुंबईत ऑनर किलिंग : आधी जावयाची सपासप वार करत हत्या, नंतर मुलीला ठेचून मारलं!

या संघाने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या T20 विश्वचषकातही प्रोटीज संघाचा पराभव केला होता. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका तिसऱ्यांदा 50 षटकांच्या विश्वचषकात पुन्हा एकदा कमकुवत ठरली. या सामन्याच्या निमित्ताने विश्वचषकात दुसरा धमाका पाहायला मिळाला. यापूर्वी 15 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानने गतविजेत्या इंग्लंडचा 69 धावांनी पराभव केला होता.

आफ्रिकेची उडाली घसरगुंडी

लक्ष्याचा पाठलाग करताना क्विंटन डी कॉक आणि बावुमा यांनी सुरुवातीला फॉर्म दाखवत 36 धावांची भागीदारी केली. यादरम्यान डी कॉकने दोन चौकार आणि एक षटकार तर बावुमाने तीन चौकार मारले. कॉलिन अकरमनच्या फिरकीने नेदरलँड्सला पहिले यश मिळवून दिले. त्याचा चेंडू स्वीप करताना डी कॉकला कीपर एडवर्ड्सने झेलबाद केले. एका ओव्हरनंतर बावुमाही निघून गेला. त्याला व्हॅन डर मर्वेने बोल्ड केले. एडन मार्कराम (1) आणि रॅसी व्हॅन डर डुसेन (4) यांनी निराशा केली. दोघेही सहा चेंडूंत परतले. यासह दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या चार विकेट्सवर 44 धावा झाली.

Advertisement

मिलरने दिला लढा

मार्करामला व्हॅन मिकेरेनने बोल्ड केले आणि रिव्हर्स स्वीप खेळताना ड्युसनला आर्यन दत्तने झेलबाद केले. मिलर आणि हेन्रिक क्लासेन यांनी पाचव्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी करून संघाला संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. क्लॉसेन चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता, पण त्याने लोगान व्हॅन बीकचा शॉर्ट बॉल फाइन लेगच्या दिशेने वळवला आणि थेट विक्रमजीत सिंगच्या हाती झेल दिला. मार्को यान्सननेही मिलरला साथ देण्याचा प्रयत्न केला आणि एक टोक धरले. 25 चेंडूत सहा धावा केल्यानंतर तो व्हॅन मीकरेनच्या गोलंदाजीवर बाद झाला. दरम्यान, नेदरलँड्सला मिलरची विकेट घेण्याची संधी होती. पण व्हॅन डेर मर्वेच्या चेंडूवर बास डी लीड बाऊंड्रीवर झेलबाद झाला.

हेही वाचा >> ‘शेवटची संधी देतोय’, सुप्रीम कोर्ट विधानसभा अध्यक्षांवर संतापले

नेदरलँडची टॉप ऑर्डर ठरली अपयशी

ढगाळ वातावरण होते आणि दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कागिसो रबाडा, मार्को जॅन्सन आणि लुंगी एनगिडी यांनी अनुकूल परिस्थितीचा फायदा घेत नेदरलँडची धावसंख्या 34 व्या षटकात सात विकेट्सवर 140 धावांपर्यंत कमी केली. रबाडाने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर विक्रमजीत सिंगला (2) बाद केले, तर जॉन्सनने सहा चेंडूंनंतर सलामीचा साथीदार मॅक्स ओ'डॉड (18) याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. नेदरलँड्स संघाने थोड्या अंतराने विकेट गमावल्या आणि अडचणीत सापडलेला दिसला.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज