For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

ODI वर्ल्डकप आधीच टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! 'या' अंपायरच्या एन्ट्रीने खळबळ

04:35 PM Sep 27, 2023 IST | प्रशांत गोमाणे
odi वर्ल्डकप आधीच टीम इंडियाचं टेन्शन वाढलं   या  अंपायरच्या एन्ट्रीने खळबळ
ऑस्ट्रेलिया विरूद्ध मालिकेनंतर टीम इंडियाला थेट वनडे वर्ल्ड कप खेळायचा आहे. आयसीसीच्या या स्पर्धेत अंपायर्सच्या स्क्वॉडमध्ये रिचर्ड किटलबरो हे पंचाची भूमिका साकारणार आहेत.
Advertisement

Richard kettalborough controversial decision : ऑस्ट्रेलिया विरूद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका टीम इंडियाने 2-0 ने खिशात घातली आहे. आज या मालिकेचा शेवटचा सामना खेळवला जातोय. हा सामना जिंकून टीम इंडिया ऑस्ट्रेलियावर क्लिन स्विप करून आत्मविश्वास वाढवणार आहे. कारण या मालिकेनंतर टीम इंडियाला थेट वनडे वर्ल्ड कप खेळायचा आहे. आयसीसीच्या या स्पर्धेत अंपायर्सच्या स्क्वॉडमध्ये रिचर्ड किटलबरो हे पंचाची भूमिका साकारणार आहेत. त्यामुळे या अंपायरच्या वर्ल्ड कप एन्ट्रीने भारतीय क्रिकेट फॅन्सची धाकधूक चांगलीच वाढली आहे. नेमकं या मागच कारण काय आहे, ते जाणून घेऊयात? (odi world cup 2023 richard kettalborough controversial desicion team india shubman gill wtc)

Advertisement Whatsapp share

ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या वनडे मालिकेनंतर टीम इंडिया थेट वनडे वर्ल्ड कप खेळणार आहे. या वर्ल्ड कपला येत्या 5 ऑक्टोबर पासून सूरूवात होणार आहे. या स्पर्धेपूर्वी टीम इंडियाची डोकेदुखी वाढली आहे. कारण या स्पर्धेत रिचर्ड किटलबरो पंचाच्या भूमिकेत दिसणार आहे. या अंपायरने टीम इंडियाचे टेन्शन वाढलं आहे.

Advertisement

खरं तर एका क्रिकेट फॅन्सने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने आयसीसीच्या ज्या ज्या सामन्यात टीम इंडिया फायनल सामना खेळत आहे. त्या त्या सामन्यात रिचर्ड किटलबरो हे अंपायरच्या भूमिकेत होते. या अंपायरमुळेच टीम इंडियाला मोठ्या स्पर्धेच्या विजेतेपदापासून मुकावे लागल्याचे त्याचे म्हणणे आहे. त्याचसोबत वनडे वर्ल्ड कपमध्ये देखील हाच अंपायर असणार आहे. त्यामुळे टीम इंडियाला विजेतेपद मिळणार की नाही? असा प्रश्न त्याने उपस्थित केला आहे.

Advertisement सब्सक्राइब करा

पोस्टमध्ये काय?

एका चाहत्याने ट्विटरवर पोस्ट केलेल्या आकडेवारीनुसार, 2014 पासून 2023 पर्यंत झालेल्या ICC टूर्नामेंटमधील जवळपास सर्व नॉकआउट सामन्यांमध्ये रिचर्ड किटलबरोने मैदानावरील पंच राहिले आहेत. या अंपायरमुळेच भारताने 2014 ची वर्ल्ड कप फायनल, 2015 ची वर्ल्ड कप सेमी फायनल, 2016 टी20 वर्ल्ड कप सेमीफायनल, 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल आणि 2019 वर्ल्ड कप सेमीफायनल, 2023 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपध्ये पराभूत झाला होता, असे चाहत्याने म्हटले आहे.

Advertisement

चाहत्याने अंपायर विरूद्ध अशाप्रकारे आक्षेप घेण्यामागचे कारण म्हणजे, रिचर्ड किटलबरोचे अनेक निर्णय़ आतापर्यंत विवादीत ठरले आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये देखील ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या फायनल सामन्यात याच अंपायरने शुबमन गिलला चुकीच्या पद्धतीने आऊट दिले होते. त्यामुळे मोठा वाद देखील झाला होता.

आता हेच रिचर्ड किटलबरो वर्ल्ड़कपमध्ये देखील पंचाची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे रिचर्ड किटलबरोच्या चुकीच्या निर्णयामुळे भारताला वर्ल्डकपमध्ये फटका बसू नये,अशी चिंता क्रिकेट फॅन्स व्यक्त करतायत.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज