For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Rohit Sharma : 'खरं सांगायचं तर...', रोहितने सांगितल्या चुका, कुणाला ठरवलं जबाबदार?

11:18 AM Nov 20, 2023 IST | भागवत हिरेकर
rohit sharma    खरं सांगायचं तर      रोहितने सांगितल्या चुका  कुणाला ठरवलं जबाबदार
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताचा पराभव का झाला, याबद्दल रोहित शर्माने सविस्तरपणे भाष्य केले.
Advertisement

Australia Beat India by 6 Wickets : मायदेशात होत असलेल्या विश्वचषकावर टीम इंडिया नाव कोरणार, हे स्वप्न रविवारी (19 नोव्हेंबर) भंगले. पराभवानंतर टीम इंडियाचे अनेक खेळाडू उदास दिसत होते, मैदान सोडताना रोहित शर्मा भावूक झाला होता. विराटलाही पराभवाचे दु:ख लपवता आले नाही आणि जसप्रीत बुमराहने मोहम्मद सिराजला सांभाळण्याचा प्रयत्न केला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या झालेल्या पराभवाबद्दल कर्णधार रोहित शर्माने झालेल्या चुका सांगितल्या. टीम इंडिया कुठे आणि कशी चुकली, याबद्दल रोहित स्पष्टपणे बोलला. (After the match, Rohit Sharma told where Team India had gone wrong.)

Advertisement Whatsapp share

रोहित आणि टीम इंडियाचे खेळाडू तसेच नरेंद्र मोदी स्टेडियमवर उपस्थित प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर वर्ल्ड कप जिंकण्याची संधी गमावल्यामुळेची निराशा स्पष्ट दिसत होती. सामना संपल्यानंतर रोहितने टीम इंडियाची कुठे चूक झाली हे सांगितले. सामन्यानंतर रोहित म्हणाला, "मॅचचा निकाल आमच्या बाजूने लागला नसला, तरी आम्हाला माहित आहे की आजचा दिवस आमच्यासाठी चांगला नव्हता, पण मला संघाचा अभिमान आहे."

Advertisement

Advertisement

फायनलमध्ये पराभव, रोहित शर्मा म्हणाला...

अहमदाबादमध्ये प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेला भारतीय संघ 240 धावांपर्यंतच मजल मारू शकला. या आव्हानाचा बचाव करणे गोलंदाजांसाठी कठीण होते. रोहित शर्मा म्हणाला, "पण खरे सांगायचे तर स्कोअरमध्ये 20-30 धावांची भर पडली असती, तर बरे झाले असते. जेव्हा केएल राहुल आणि विराट कोहली फलंदाजी करत होते, तेव्हा आम्ही 270-280 धावांपर्यंत पोहोचू असे वाटत होते, पण आम्ही ठराविक काळाने विकेट गमावल्या."

हे ही वाचा >> Ind vs Aus Final Analysis: …म्हणून टीम इंडियाचा अंतिम सामन्यात झाला ‘गेम’, पराभवाची 5 मोठी कारणं

ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं. त्यांच्या विजयाबद्दल रोहित म्हणाला, 'ऑस्ट्रेलियाने तीन विकेट गमावल्यानंतर मोठी भागीदारी केली. 240 धावा केल्यानंतर आमच्या गोलंदाजांनी सुरुवातीच्या विकेट्स घ्याव्यात अशी आमची इच्छा होती, परंतु श्रेय ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबुशेन यांना जाते, त्यांनी आम्हाला पूर्णपणे सामन्यातून बाहेर ढकलले."

विश्वचषक फायनल हरल्यानंतर रोहित म्हणाला, आम्ही कारणे देत...

नाणेफेक हरल्यानंतर रोहित म्हणाला होता की, नाणेफेक जिंकली असती तर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता. तो म्हणाला, "मला वाटले होते की ही दिवसा खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली आहे. आम्हाला माहित होते की दिवसभरात ती चांगली होईल. आम्ही यावर कोणतेही कारण देऊ इच्छित नाही. आम्ही चांगली फलंदाजी केली नाही, पण मोठी भागीदारी करण्याचे श्रेय त्याच्या हेड आणि लॅबुशेनला जाते."

कमिन्स म्हणाला, अंतिम सामन्यासाठी सर्वोत्तम खेळ राखून ठेवला

ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला, "माझ्या मते अंतिम सामन्यासाठी आम्ही सर्वोत्तम कामगिरी राखून ठेवली होती. मोठ्या सामन्यात काही खेळाडूंनी चांगली कामगिरी केली."

हे ही वाचा >> World Cup 2023: भारताचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न कसे भंगले? सेहवाग-गावस्करांनी सांगितली चूक

कमिन्स पुढे म्हणाले, "आज आम्हाला वाटले की धावांचा पाठलाग करणे चांगले होईल आणि ते सोपेही असेल. खेळपट्टी अतिशय संथ होती. चेंडू स्पिन होत नव्हता. आम्ही योग्य टप्प्यावर गोलंदाजी केली."

वर्ल्ड कप फायनलचा सामनावीर ट्रॅव्हिस हेड काय म्हणाला?

सामना संपल्यानंतर 'प्लेअर ऑफ द मॅच' ट्रॅव्हिस हेड (137 धावा) म्हणाला, "आजचा दिवस खूप चांगला ठरला. या दिवसाचा भाग बनू शकल्याचा मला खूप आनंद आहे. मी थोडा घाबरलो होतो, पण मार्नसने शानदार खेळ केला आणि सर्व दडपण दूर केले. मला वाटते मिशेल मार्शने सामन्याचा लय सेट केली.''

हे ही वाचा >> Virat Kohli, Rohit Sharma Cry: रोहित-कोहलीच्या डोळ्यात अश्रू, सिराज मैदानाच रडला, पहा Video

नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याच्या पॅट कमिन्सच्या निर्णयाचे हेडने कौतुक केले. "प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय उत्कृष्ट होता आणि जसजसा सामना पुढे सरकत गेला तसतशी विकेट चांगली होत गेली. याचा फायदा आम्हाला झाला", असे तो म्हणाला.

लॅबुशेन म्हणाला, टीम इंडिया चांगली खेळली, पण...

58 धावांची नाबाद खेळी करणाऱ्या मार्नस लॅबुशेनने ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, "भारत या स्पर्धेत उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता, पण जेव्हा तुम्ही तुमचे सर्वोत्तम क्रिकेट खेळता तेव्हा तुम्हाला संधी असते. आमच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली आणि ट्रॅव्हिसची कामगिरी अप्रतिम होती. कामगिरी अविश्वसनीय झाली आहे. माझ्याकडे शब्द नाहीत. दोन महिन्यांपूर्वी तो एकदिवसीय सामन्यांच्या संघातही नव्हता."

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज