For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Time Out Controversy : "माझ्यासोबत...", 'टाइम आऊट'वर शाकिब अल हसनने सोडलं मौन

02:33 PM Nov 07, 2023 IST | भागवत हिरेकर
time out controversy    माझ्यासोबत       टाइम आऊट वर शाकिब अल हसनने सोडलं मौन
टाइम आऊट वादावर शाकिब अल हसनने काय केला खुलासा? आयसीसीवरच फोडलं खापर.
Advertisement

Time Out Controversy Shakib Al Hasan Explanation : श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील सामना वेगळ्याच कारणाने गाजला. टाइम आऊट वादानंतर श्रीलंकेचा बांगलादेशने 3 गडी राखून पराभव केला. पण सामना संपल्यानंतर शाकिब अल हसन आणि अँजेलो मॅथ्यूज या दोघांनी मोठमोठी विधाने केली. मॅथ्यूज आदरा न करण्याचा मुद्दा उपस्थित केला, तर शाकिबने खेळ भावना लक्षात घेऊन आयसीसीने आपले नियम बदलले पाहिजेत, अशी भूमिका मांडली. (Shakib Al Hasan raised questions on ICC and said that this is their rule and I just used it.)

Advertisement Whatsapp share

अँजेलो मॅथ्यूज टाइम आऊटचा बळी ठरला आणि एकही चेंडू न खेळता पॅव्हेलियनमध्ये परतला. अशा पद्धतीने बाद झालेला तो जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला. शाकिबने केलेले अपील आणि त्यानंतर झालेल्या वादाने हा सामना जास्त गाजला.

Advertisement

शाकिबने आयसीसीला ठरवले दोषी

मॅचनंतरच्या पत्रकार परिषदेत जेव्हा शाकिबला मॅथ्यूजच्या टाइम आउट आणि खिलाडूवृत्तीबद्दल विचारण्यात आले; तेव्हा तो म्हणाला की, "आयसीसीने आपले नियम बदलले पाहिजेत. आयसीसीने या प्रकरणात लक्ष घालून नियम बदलले पाहिजेत."

Advertisement सब्सक्राइब करा

हे ही वाचा >> Angelo Mathews ने लगेच घेतला Time Out चा बदला! शाकिबला…; पाहा व्हिडिओ

साकिब पुढे म्हणाला की, "अशा गोष्टी माझ्यासोबत घडत नाहीत कारण मी खूप सावध असतो." शाकिबने सांगितले की, "सामना सुरू असताना मला एका खेळाडूने या नियमाबद्दल माहिती दिली आणि सांगितले की, आपण टाइम आऊटचा नियम वापरू शकतो."

मॅथ्यूजची मागणी शाकिबने का फेटाळली?

पंचानी बाद घोषित केल्यानंतर मॅथ्यूजने साकिबला हे अपील मागे घेण्याची विनंती केली. तेव्हा त्याने नकार दिला. याबद्दल बोलताना शाकिब म्हणाला की, "माझा क्षेत्ररक्षक माझ्याकडे आला आणि म्हणाला, जर तुम्ही अपील केले तर तो बाहेर जाईल कारण त्याने योग्य वेळी हेल्मेट घेतलं नाही. त्यामुळे मी अपील केले आणि पंचांनी माझी विनंती मान्य केली. अंपायरने मला विचारले की तू त्याला परत बोलावशील का? त्यावर मी त्यांना नकार दिला.

Advertisement

आयसीसीच्या नियमावर शाकिबने ठेवले बोट

शाकिब म्हणाला की, "आम्ही दोघेही एकमेकांसोबत अंडर-19 विश्वचषक खेळलो आहोत आणि आम्ही एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतो. आम्ही दोघे 2006 पासून एकमेकांना ओळखतो पण नियम असेच असतील तर काय करायचे?", असा सवाल त्याने उपस्थित केला.

हे ही वाचा >> Angelo Mathews Time Out : सौरभ गांगुली होणार होता ‘टाइम आऊट’, पण…

श्रीलंकेच्या डावाच्या 25व्या षटकात शाकिबने सदीरा समरविक्रमाला बाद केले. यानंतर अँजेलो मॅथ्यूज मैदानात आला. तो फलंदाजीसाठी तयार होत असताना त्याच्या हेल्मेटचा पट्टा तुटला. त्याने दुसरे हेल्मेट मागवले. ड्रेसिंग रूममधून नवीन हेल्मेट येईपर्यंत 2 मिनिटे निघून गेली होती. त्याचवेळी बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनने मॅथ्यूजला आऊट देण्याचे अपील केले. त्यानंतर मॅथ्यूजला बाद घोषित करण्यात आले. यानंतर मॅथ्यूजने पंचांशी बराच वाद घातला पण शेवटी त्याला मैदान सोडावे लागले.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज