For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

शुभमन गिलच्या आजाराने वाढवलं टीम इंडियाचं टेन्शन; बीसीसीआयने दिली मोठी अपडेट

05:32 PM Oct 09, 2023 IST | भागवत हिरेकर
शुभमन गिलच्या आजाराने वाढवलं टीम इंडियाचं टेन्शन  बीसीसीआयने दिली मोठी अपडेट
शुभमन गिलच्या आरोग्याबद्दल बीसीसीआयने महत्त्वाची अपडेट दिली आहे.
Advertisement

Shubman Gill Health Update: ICC ODI World Cup 2023 मध्ये भारतीय क्रिकेट संघासाठी एक वाईट बातमी आलीये. डेंग्यूने त्रस्त असलेला स्टार सलामीवीर शुभमन गिल अफगाणिस्तानविरुद्धचा दुसरा सामनाही खेळू शकणार नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ही माहिती दिली आहे.

Advertisement Whatsapp share

भारतीय संघाने विश्वचषकातील पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. या सामन्यात संघाने 6 गडी राखून विजय मिळवला. चेन्नई येथे झालेल्या या सामन्यातही शुभमन गिल खेळला नाही. आता भारतीय संघाला आपला दुसरा सामना अफगाणिस्तानविरुद्ध बुधवारी (11 ऑक्टोबर) दिल्लीत खेळायचा आहे.

Advertisement

चेन्नईतील वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली

शुभमन गिलचे आरोग्य अपडेट जारी करताना, बीसीसीआयने म्हटले आहे की तो अजूनही चेन्नईतील वैद्यकीय पथकाच्या निरीक्षणाखाली आहे. गिल संघासह दिल्लीला पोहोचलेला नाही. त्यामुळे तो अफगाणिस्तानविरुद्धचा सामना खेळू शकणार नाही. मात्र, यानंतर भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्ध 14 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये तिसरा सामना खेळायचा आहे. बीसीसीआयने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. पण या तिसर्‍या सामन्यातही गिलच्या खेळण्याची शक्यता फारच कमी दिसत आहे.

Advertisement सब्सक्राइब करा

हेही वाचा >> किंग कोहलीचा तेंडुलकरला धोबीपछाड, Ind vs Aus सामन्यात झाले 11 ऐतिहासिक विक्रम

बीसीसीआयने म्हटले आहे की, शुभमन गिल हळूहळू बरा होत आहे. बोर्डाने सांगितले की, भारतीय संघाचा स्टार फलंदाज शुभमन गिल संघासह दिल्लीला पोहोचलेला नाही. चेन्नई येथे विश्वचषक 2023 च्या स्पर्धेत सलामीवीर शुभमन गिल भारतीय संघाकडून पहिला सामनाही खेळू शकला नाही. आता तो दिल्लीत होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात खेळणार नाही. गिल चेन्नईत मुक्काम करून वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहेत.

गिलच्या जागी ईशानला मिळणार संधी

6 ऑक्टोबरलाच ही माहिती समोर आली होती की, शुभमन गिलची डेंग्यू चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे 9 ऑक्टोबर रोजी झालेल्या पहिल्या सामन्यात तो खेळू शकला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात गिलच्या जागी इशान किशनला मैदानात उतरवण्यात आलं होतं. ओपनिंग करताना ईशानला खातेही उघडता आले नाही. आता अफगाणिस्तानविरुद्धही केवळ इशानला संधी दिली जाऊ शकते.

Advertisement

हेही वाचा >> चित्यासारखी झेप… विराट कोहलीने घेतला अप्रतिम झेल; पहा VIDEO

शुभमन गिलचे रेकॉर्ड आणि आकडेवारी

शुभमन गिलने 35 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने आतापर्यंत 66.10 च्या सरासरीने आणि 102.84 च्या स्ट्राइक रेटने 1917 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 6 शतके आणि 9 अर्धशतके आहेत. अशा स्थितीत त्याला वनडेमध्ये संघात घेणे खूप महत्त्वाचे आहे. तर 11 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शुभमन गिलने 11 सामन्यांमध्ये 30.40 च्या सरासरीने 304 धावा केल्या आहेत. तर 18 कसोटी सामन्यांच्या 33 डावांमध्ये गिलने 32.20 च्या सरासरीने 966 धावा केल्या आहेत.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज