For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

World Cup 2023 : स्टंप कॅमेरा ते ड्रोनची दृश्य! एका सामन्यासाठी स्टेडियममध्ये किती असतात कॅमेरे?

12:21 PM Nov 19, 2023 IST | mahadev kamble
world cup 2023    स्टंप कॅमेरा ते ड्रोनची दृश्य  एका सामन्यासाठी स्टेडियममध्ये किती असतात कॅमेरे
ICC World Cup 2023 चा अंतिम सामना आज होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना आज दुपारी 2 वाजता सुरू होणार आहे. या सामन्यासाठी आणि प्रक्षेपणासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
Advertisement

Camera Used in Cricket World Cup: ICC World Cup 2023 चा अंतिम सामना आज होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना आज दुपारी 2 वाजता सुरू होणार आहे. या सामन्यासाठी आणि प्रक्षेपणासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर होत असला तरी या World Cup 2023 च्या निमित्ताने पुन्हा एकदा तंत्रज्ञानाच्या बाबतीत जोरदार तयारी करण्यात आली आहे.

Advertisement Whatsapp share

कॅमेऱ्यांचं तंत्रज्ञान

क्रिकेटचा सामना ज्यावेळी टीव्हीवर पाहिला जात असतो त्यावेळी तो वेगवेगळ्या अँगलने सामना दाखवला जात असतो. त्यामुळे क्रिकेटप्रेमीही त्याचा वेगळा आनंद घेत असतात. मात्र त्यासाठी नेमकं तंत्रज्ञान काय वापरले जाते ते तुम्हाला माहिती आहे का ? त्यासाठी किती कॅमेरे लावले जातात, ते कोणत्या पद्धतीने लावले जातात. त्यासाठीच आज आम्ही तुम्हाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात कोणत्या प्रकारचे आणि किती कॅमेरे वापरले जातात ते सांगणार आहोत.

Advertisement

हे ही वाचा >> प्रसिद्ध अभिनेत्याचा बंद कारमध्ये सापडला मृतदेह! पोलिसांनी सांगितली धक्कादायक माहिती

अशा प्रकारचे वापरले जातात कॅमेरे

ऑउटसाइड ब्रॉडकास्टिंग स्टुडिओसाठी 1 कॅमेरा
>> मैदानातील सामना कव्हर करण्यासाठी 12 कॅमेरे
>> 6-हॉकी कॅमेरे
>> रन-आउट व्हिडिओ कॅप्चर करण्यासाठी 4 कॅमेरे
>> स्ट्राइक झोन कॅप्चर करण्यासाठी 2 कॅमेरे
>> 4-स्टंप कॅमेरे
>> 1-प्रेझेंटेशन कॅमेरा

Advertisement सब्सक्राइब करा

हे ही वाचा >> Uddhav Thackeray : ‘देशात मोदी-शहाच निवडणूक आयोग बनलाय’, ठाकरेंचा सामनातून हल्ला

या प्रकारच्या व्यावसायिक सामन्यात अनेक प्रकारचे कॅमेरे वापरले जातात. कारण प्रत्येक कॅमऱ्याचे काम वेगळे असते. कारण प्रेक्षकांना कोणत्याही सामन्याचा चांगला आणि वेगळा अनुभव द्यायचा असतो.

Advertisement

Main Camera- मेन कॅमेरे म्हणजे मुख्य कॅमेरे हे अगदी योग्य आणि अगदी नियोजनबद्धपणे ते बसवले जातात. हे कॅमेरेही अशा पद्धतीने बसवले जातात की सामना कोणताही असला तरी तो कोणत्याही अँगलने कॅप्चर करु शकतो.

Boundary Camera- सामना चालू असताना काही कॅमेरे हे मैदानाच्या अगदी बॉर्डरवर लावलेले दिसतात. हे कॅमेरे क्षेत्ररक्षणाच्या क्लोज-अप शॉट्ससाठी वापरले जातात. त्या कॅमेऱ्यामुळेच खेळाडूंच्या हालचालींचा सर्व तपशीलवार दाखवण्यात येतो.

Stump Camera- हे कॅमेरे स्टंपच्या बरोबर मध्यभागी लावले जातात. हे कॅमेरे गोलंदाज, फलंदाज आणि यष्टीरक्षकाशी ज्या काही घडामोडी घडत असतात त्या दाखवण्याचा प्रयत्न या कॅमेऱ्याच्या मदतीने केले जाते. या कॅमेऱ्याच्या मदतीमुळेच स्टंपजवळील स्लो मोशन रिप्लेही तुम्ही पाहू शकत असता.

Spider Camera- या कॅमेरा त्याच्या नावाप्रमाणेच आहे. सामन्यावेळी हा कॅमेरा उभ्या आणि आडव्या दोन्ही दिशेने फिरू शकत असतो. या कॅमेऱ्यांच्या माध्यमामधून डायनॅमिक एरियल शॉट्स उपलब्ध होऊ शकत असतात.

ultra slow- motion camera-  हाय स्पीड कॅमेरे हे सामन्यातील कोणताही क्षण अगदी हाय क्वॉलिटीने तो क्षण कॅप्चर करु शकत असतात. त्या कॅमेऱ्याच्या मदतीनेच स्लो मोशन रिप्लेचाही तपशील उपलब्ध होऊ शकत असतो. त्यामुळे सामन्यातील अनेक वेगवेगळे क्षण तुम्ही या कॅमेऱ्याच्या मदतीने पाहू शकत असता.

Helmet Camera- सामन्यावेळी खेळाडूंना हेल्मेट कॅमेरे घालून खेळण्यास पाठवले जातात. त्याच्या माध्यमातून समोरील बॉलर दिसत असतो.

Robotic Camera- रोबोटिक कॅमेरे म्हणजेच रिमोट कंट्रोलचे कॅमेरे हे वेगवेगळ्या ठिकाणीही बसवले जातात. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून सामन्यातील अगदी कोणताही क्षण बारकाव्याने टिपला जातो.

हे ही वाचा >> Ind vs Aus World Cup Final LIVE : भारत-ऑस्ट्रेलियात महामुकाबला! वर्ल्ड कप कोण जिंकणार?

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज