For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Virat Kohli : अखेर 'विराट' इतिहास घडला! कोहलीने सचिन तेंडुलकराला टाकलं मागे

07:44 PM Nov 15, 2023 IST | प्रशांत गोमाणे
virat kohli   अखेर  विराट  इतिहास घडला  कोहलीने सचिन तेंडुलकराला टाकलं मागे
virat kohli 50th odi century breaks sachin tendulkar record odi cricket india vs new zealand odi world cup 2023
Advertisement

Virat Kohli 50th Odi Century, Odi World Cup : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने (Virat Kohli) न्युझीलंड (New Zealand) विरूद्धच्या वर्ल्ड कपमधील सेमी फायनल सामन्यात कारकिर्दीतले 50 वे शतक झळकावले आहे. विराटने हे 50 वे शतक झळकावून अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. या शतकासह विराट कोहली वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावणारा पहिला खेळाडू ठरला आहे. तसेच विराटने क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर (sachin tendulkar) याचा विक्रम देखील मोडला आहे. त्यामुळे विराटने या शतकासह कोणते कोणते रेकॉर्ड ब्रेक केले आहेत, हे जाणून घेऊयात. (virat kohli 50th odi century breaks sachin tendulkar record odi cricket india vs new zealand odi world cup 2023)

Advertisement Whatsapp share

सचिनचा रेकॉर्ड ब्रेक

वानखेडेवर रंगलेल्या सेमी फायनल सामन्यात विराटने कारकिर्दीतले 50 वे शतक ठोकले आहे. हे शतक ठोकून विराट कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याचा विक्रम मोडला आहे. सचिन तेंडुलकरच्या नावे कारकिर्दीत 49 शतक होती. त्याचा हा विक्रम मोडण्याचा प्रयत्न अनेक खेळाडूंनी केला.मात्र अनेकांना त्याच्या या विक्रमाच्या जवळपासही पोहोचता आले नाही. विराट याला अपवाद ठरला होता. आणि आता वानखेडेच्याच मैदानावर विराट कोहलीने सचिनचा 49 शतकांचा रेकॉर्ड मोडला आहे.

Advertisement

हे ही वाचा : Solapur: हनुवटीवर रायफल ठेवून दाबला ट्रिगर, पोलीस कॉस्टेबलने का केली आत्महत्या?

50 शतक ठोकणारा पहिला खेळाडू

आतापर्यंत सर्वाधिक शतकाचा रेकॉर्ड सचिन तेंडूलकरच्या नावे होता. सचिनने वनडेत 49 शतक ठोकले होते. विराटने हा शतकाचा रेकॉर्ड मोडत 50 वे शतक ठोकले. हे शतक ठोकून विराट कोहली वनडेत 50 वे शतक पुर्ण करणारा पहिला खेळाडू ठरलाय. त्याच्या या कामगिरीचे आता क्रिकेट वर्तुळात कौतूक होतेय.

Advertisement सब्सक्राइब करा

सर्वाधिक शतक ठोकणारे खेळाडू

विराट कोहली- 50
सचिन तेंडुलकर -49
रोहित शर्मा - 31
रिकी पॉटींग - 30
सनथ जयसूर्या -28

कोहलीने सचिनचा आणखी एक मोठा विक्रम मोडला. वर्ल्ड कपच्या एकाच सीझनमध्ये तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. सचिनने वर्ल्ड कपमध्ये 673 धावा केल्या होत्या आणि आता कोहलीने हा आकडा देखील पार केला आहे. सचिननंतर या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन (659, वर्ल्ड कप 2007), कर्णधार रोहित शर्मा (648, वर्ल्ड कप 2019) आणि कांगारूंचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (647, वर्ल्ड कप 2019) यांचा समावेश आहे. या खेळाडूंना देखील त्याने मागे टाकले आहे.

Advertisement

हे ही वाचा : Advay Ahire : ठाकरे गटाच्या नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं प्रकरण काय?

न्युझीलंडसमोर धावांचा डोंगर

विराट कोहलीच्या 117, श्रेयस अय्यरच्या 105 धावांच्या शतकी खेळीच्या बळावर आणि शुभमन गिलच्या नाबाद 80 धावाच्या बळावर टीम इंडियाने 4 विकेट गमावून 397 धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे आता न्युझीलंडसमोर 398 धावांचे आव्हान असणार आहे.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज