For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Virat kohli : 'तेव्हा तुझी सगळे मस्करी....', 'विराट' कामगिरीनंतर सचिन तेंडुलकर भारावला, ड्रेसिंग रूममधला सांगितला किस्सा?

07:15 PM Nov 15, 2023 IST | प्रशांत गोमाणे
virat kohli    तेव्हा तुझी सगळे मस्करी        विराट  कामगिरीनंतर सचिन तेंडुलकर भारावला  ड्रेसिंग रूममधला सांगितला किस्सा
virat kohli 50th odi century sachin tendulkar first reaction india vs new zealand odi world cup 2023
Advertisement

Virat Kohli 50th Odi Century, Odi World Cup : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने (Virat Kohli) न्युझीलंड (New Zealand) विरूद्धच्या वर्ल्ड कपमधील सेमी फायनल सामन्यात कारकिर्दीतले 50 वे शतक झळकावले आहे. विराटने हे 50 वे शतक झळकावून क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर (sachin tendulkar) याचा विक्रम देखील मोडला आहे.यानंतर आता सचिन तेडुलकरने या विराट शतकावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. (virat kohli 50th odi century sachin tendulkar first reaction india vs new zealand odi world cup 2023)

Advertisement Whatsapp share

क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकरने एक्स या सोशल माध्यमावर विराटच्या ऐतिहासिक 50 व्या शतकावर प्रतिक्रिया दिली आहे. जेव्हा तुला मी पहिल्यांदा भारतीय ड्रेसिंग रुममध्ये भेटलो, तेव्हा तु माझ्या पायाला स्पर्श केला होतास, म्हणून ड्रेसिंगरूममधल्या इतर सहकाऱ्यांनी तुझी थट्टा मस्करी केली. त्या दिवशी मला हसू आवरता आले नाही.पण लवकरच, तू तुझ्या उत्कटतेने आणि कौशल्याने माझ्या हृदयाला स्पर्श केलास. तो तरुण मुलगा ‘विराट’ खेळाडू झाला आहे याचा मला खूप आनंद आहे, असे सचिन म्हणाला.

Advertisement

मला यापेक्षा जास्त आनंद नाही होऊ शकत की एका भारतीयाने माझा विक्रम मोडला आणि तोही वर्ल्ड कप सेमी फायनलसारख्या मोठ्या मंचावर, असेही सचिनने म्हटले आहे.

Advertisement सब्सक्राइब करा

हे ही वाचा : Advay Ahire : ठाकरे गटाच्या नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं प्रकरण काय?

सचिनचा रेकॉर्ड ब्रेक

वानखेडेवर रंगलेल्या सेमी फायनल सामन्यात विराटने कारकिर्दीतले 50 वे शतक ठोकले आहे. हे शतक ठोकून विराट कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याचा विक्रम मोडला आहे. सचिन तेंडुलकरच्या नावे कारकिर्दीत 49 शतक होती. त्याचा हा विक्रम मोडण्याचा प्रयत्न अनेक खेळाडूंनी केला.मात्र अनेकांना त्याच्या या विक्रमाच्या जवळपासही पोहोचता आले नाही. विराट याला अपवाद ठरला होता. आणि आता वानखेडेच्याच मैदानावर विराट कोहलीने सचिनचा 49 शतकांचा रेकॉर्ड मोडला आहे.

हे ही वाचा : Crime : … अन् मालकिणीने नोकराचा कापला प्रायव्हेट पार्ट, कारण ऐकून पोलिसही चक्रावले

आतापर्यंत सर्वाधिक शतकाचा रेकॉर्ड सचिन तेंडूलकरच्या नावे होता. सचिनने वनडेत 49 शतक ठोकले होते. विराटने हा शतकाचा रेकॉर्ड मोडत 50 वे शतक ठोकले. हे शतक ठोकून विराट कोहली वनडेत 50 वे शतक पुर्ण करणारा पहिला खेळाडू ठरलाय. त्याच्या या कामगिरीचे आता क्रिकेट वर्तुळात कौतूक होतेय.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज