For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Virat Kohli : किंग 'कोहली' सचिन तेंडुलकरच्या पंक्तीत, बॅट तळपली घडवला 'विराट' इतिहास!

07:16 PM Nov 05, 2023 IST | भागवत हिरेकर
virat kohli   किंग  कोहली  सचिन तेंडुलकरच्या पंक्तीत  बॅट तळपली घडवला  विराट  इतिहास
Virat Kohli 49 th Odi Century : विराट कोहलीने केली सचिन तेंडुलकरची बरोबरी. एकदिवसीय क्रिकेटमधील 49 शतकं झळकावलं.
Advertisement

Virat Kohli ODI centuries : 35व्या वाढदिवशी किंग कोहलीने अविस्मरणीय खेळी केली. भारतात होत असलेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. टीम इंडियाने पहिले 7 सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. रविवारी (5 नोव्हेंबर) कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 8 वा सामना खेळला. या सामन्यात किंग कोहलीची बॅट तळपली. विराटने एकदिवसीय क्रिकेटमधील 49 शतक झळकावत सचित तेंडुलकरची बरोबरी केली. (Virat Kohli equaled Sachin Tendulkar's record of ODI centuries)

Advertisement Whatsapp share

विराट कोहलीने त्याचा 35 वा वाढदिवस खास पद्धतीने सेलिब्रेट केला. कोहलीने त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक अविस्मरणीय भेट दिली. खरंतर विराट कोहलीची बॅट या विश्वचषकात रन मशिन झाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धही त्याने आपला फॉर्म कायम ठेवला आणि कारकिर्दीतील 49 वे शतक झळकावून एका विराट इतिहासाची विक्रमाची बरोबरी केली. कोहलीने 119 चेंडूत आपले शतक पूर्ण केले.

Advertisement

कोहलीने केली सचिनच्या ऐतिहासिक विक्रमाची बरोबरी

कोहलीने वनडेमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत सचिनच्या (49 शतके) ऐतिहासिक विक्रमाची बरोबरी केली. कोहलीने कारकिर्दीतील 277व्या वनडे इनिंगमध्येच झंझावाती 49 शतके झळकावली आहे. सचिनने आपल्या 451व्या डावात ही कामगिरी केली होती.

Advertisement सब्सक्राइब करा

Video : पिटबुल तोडत होता लचके अन् कुटुंब पाहत राहिलं, भयंकर घटना कॅमेऱ्यात कैद

सचिनने आपल्या कारकिर्दीत 463 एकदिवसीय सामने खेळले, ज्यात त्याने 452 डावांमध्ये 44.83 च्या सरासरीने 18,426 धावा केल्या. त्याने एकूण 49 एकदिवसीय शतके झळकावली. सचिन आणि कोहलीने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 49-49 शतके झळकावली आहेत. त्यांच्यानंतर रोहित शर्मा (31) दुसऱ्या स्थानावर आहे. म्हणजे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारे टॉप-3 फलंदाज हे सर्व भारतीय आहेत.

एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतके करणारे खेळाडू

सचिन तेंडुलकर - 452 डाव - 49 शतके
विराट कोहली - 277 डाव - 49 शतके
रोहित शर्मा - 251 डाव - 31 शतके
रिकी पाँटिंग - 365 डाव - 30 शतके
सनथ जयसूर्या - 433 डाव - 28 शतके

Advertisement

तीन वेळा हुकले विराट कोहलीचे शतक

वनडे वर्ल्डकपमध्ये कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या स्पर्धेत त्याने आतापर्यंत 2 शतके आणि 4 अर्धशतके केली आहेत. यापूर्वी त्याने बांगलादेशविरुद्ध 103 धावांची नाबाद खेळी खेळली होती. या विश्वचषकात कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध 95 धावा केल्या होत्या आणि त्याचे शतक हुकले होते.

हे ही वाचा >> Maratha Reservation साठी काँग्रेस आमदाराने स्वतःवरच झाडलेली गोळी, 1980 ची घटना काय?

त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 85 धावांची आणि श्रीलंकेविरुद्ध 88 धावांची खेळी केली होती. म्हणजेच या दोन्ही सामन्यातही कोहली शतकाच्या जवळ पोहोचला होता. यापैकी एकही शतक पूर्ण झाले असते तर सचिनचा सर्वाधिक शतकांचा विक्रम आजच्या शतकाने मोडला गेला असता.

आता भारतीय संघाला 12 नोव्हेंबरला नेदरलँड्सविरुद्ध आपला पुढचा गट सामना खेळायचा आहे. हा सामना बंगळुरू येथे होणार आहे, जे कोहलीचे होम ग्राउंड देखील आहे (आयपीएलच्या दृष्टीने). अशा स्थितीत त्या सामन्यात कोहलीकडून शतकाची अपेक्षा असेल. त्यानंतर त्याला सचिनचा हा विक्रम मोडण्याचीही संधी असेल.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज