For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Ind vs Aus Final : टॉस जिंकूनही का केली नाही प्रथम फलंदाजी? कमिन्सने सांगितलं कारण

04:22 PM Nov 19, 2023 IST | भागवत हिरेकर
ind vs aus final   टॉस जिंकूनही का केली नाही प्रथम फलंदाजी  कमिन्सने सांगितलं कारण
अहमदाबादमध्ये आतापर्यंत 30 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत आणि प्रथम फलंदाजी आणि गोलंदाजी करणाऱ्या संघांनी प्रत्येकी 15 वेळा विजय मिळवला आहे.
Advertisement

Ind vs Aus Final, Pat Cummins Statement : विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात नाणेफेक ऑस्ट्रेलियाच्या पारड्यात पडली. पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, त्याच्या या निर्णयाचे सगळ्यांना आश्चर्य वाटले. कारण अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी संथ असल्याने त्याचा निर्णय चकित करणारा होता. याचा फायदा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांना मिळेल. पण, ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करण्याचं कारण पॅट कमिन्सने सांगितले.

Advertisement Whatsapp share

दुसरीकडे नाणेफेक जिंकली असती, तर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता, असे भारतीय कर्णधार रोहित शर्माने सांगितले नाणेफेक झाल्यानंतर सांगितलं. आता कमिन्सची बाजी योग्य ठरणार की उलटफेर होणार हे पाहावे लागेल.

Advertisement

ऑस्ट्रेलियाने का घेतली प्रथम गोलंदाजी?

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार कमिन्स म्हणाला, 'ही खेळपट्टी कोरडी दिसत आहे आणि आम्हाला प्रथम गोलंदाजी करायची आहे. दव हे एक कारण आहे आणि रात्री येथे भरपूर दव असते. नंतर फलंदाजी करणे सोपे होईल."

Advertisement सब्सक्राइब करा

हे ही वाचा >> World Cup 2023 : स्टंप कॅमेरा ते ड्रोनची दृश्य! एका सामन्यासाठी स्टेडियममध्ये किती असतात कॅमेरे?

भारताचा कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, "मला प्रथम फलंदाजी करायला आवडले असते. चांगली खेळपट्टी दिसते. जर तो मोठा सामना असेल, तर जास्त धावा लावायला आवडेल."

अहमदाबादमध्ये टॉसचं गणित कसं आहे?

अहमदाबादमध्ये आतापर्यंत 30 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत आणि प्रथम फलंदाजी आणि गोलंदाजी करणाऱ्या संघांनी प्रत्येकी 15 वेळा विजय मिळवला आहे. म्हणजे आत्तापर्यंत सामन्याचे निकाल दोन्हींनी समान लागलेले आहेत.

Advertisement

या विश्वचषकाबद्दल बोलायचे झाले तर फायनलपूर्वी येथे चार सामने खेळले गेले. यापैकी केवळ एका सामन्यात नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने प्रथम फलंदाजी केली आणि पराभव झाला. हा सामना अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला जिथे अफगाण संघाने प्रथम फलंदाजी केली.

हे ही वाचा >> IND vs AUS Final: 20 वर्षांपूर्वी एका चुकीमुळे हुकलं विजेतेपद, भारताचा का झाला होता पराभव?

उरलेल्या तीनपैकी दोन सामन्यांमध्ये प्रथम क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने विजय मिळवला. यामध्ये न्यूझीलंडने इंग्लंडचा नऊ गडी राखून, तर भारताने पाकिस्तानचा सात गडी राखून पराभव केला. या विश्वचषकात अहमदाबादमध्ये प्रथम फलंदाजी करूनही जिंकणारा ऑस्ट्रेलिया हा एकमेव संघ आहे. नाणेफेक गमावल्यानंतर इंग्लंडविरुद्ध क्षेत्ररक्षण घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाने 33 धावांनी विजय मिळवला होता.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज