For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Ind vs Aus World Cup Final: टीम इंडिया फायनलमध्येच का हरली? 6 गोष्टी पडल्या महागात

12:11 PM Nov 21, 2023 IST | भागवत हिरेकर
ind vs aus world cup final  टीम इंडिया फायनलमध्येच का हरली  6 गोष्टी पडल्या महागात
भारताचा वर्ल्ड कप २०२३ च्या अंतिम सामन्यात पराभव का झाला? कुठल्या गोष्टींचा होता अभाव?
Advertisement

Why India lost wc 2023 : तब्बल दीड महिने सातत्यपूर्ण आणि जबरदस्त कामगिरी करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाची 2023 च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वाईट अवस्था झाली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी (19 नोव्हेंबर) खेळल्या गेलेल्या या अंतिम फेरीत कांगारूंनी भारताचा 6 गडी राखून पराभव केला. या सामन्यात भारतीय संघाच्या अनेक कमकुवत बाजू समोर आल्या, ज्यात सुधारणा करण्याची गरज आहे. (Why India lost the 2023 World Cup?)

Advertisement Whatsapp share

भारतीय संघ या स्पर्धेत चांगला खेळला आहे, असेही क्रिकेटप्रेमींचे मत आहे. सलग 10 सामने जिंकून अंतिम फेरी गाठली. त्यामुळे फायनलमधील पराभव हा खूप मोठा आणि महत्त्वाचा ठरतो. यातून भारतीय संघाने खूप धडा शिकायला हवा. जाणून घेऊया कुठल्या गोष्टी पडल्या महागात...

Advertisement

मोठ्या सामन्यासाठीची मानसिकताच नव्हती

सलग 10 सामने जिंकले, पण फायनलमध्ये परिस्थिती थोडी प्रतिकूल बनली आणि भारतीय संघाने शरणागती पत्करली. यावरून स्पष्टपणे दिसून येते की अशा मोठ्या स्पर्धा आणि मोठ्या सामन्यांना वेगळ्या स्वभावाची आवश्यकता असते. चॅम्पियनची मानसिकता आवश्यक आहे. पण भारतीय संघात याची स्पष्टपणे उणीव दिसून आली.

Advertisement सब्सक्राइब करा

महत्त्वाचं >> World Cup 2027 : पुढचा विश्वचषक होणार खास! कधी, कुठे अन् किती असणार टीम… जाणून घ्या

मॅक्सवेलच्या खेळीतून घेतला नाही धडा

ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची अवस्था 91 धावांवर 9 गडी बाद झालेले असतानाही विजय मिळवून दिला. त्या सामन्यात मॅक्सवेलने नाबाद द्विशतक झळकावले होते. त्यामुळे फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया जिवाची बाजी लावणार हे स्पष्टच होते. पण मॅक्सवेलच्या त्या खेळीतून भारतीय संघ काहीच शिकला नाही.

चॅम्पियन संघासमोर होता देहबोलीचा अभाव

भारतीय संघाने 47 धावांत 3 विकेट घेतल्यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबुशेन यांनी मोठी भागीदारी केली. ही भागीदारी वाढ जात असताना भारतीय खेळाडूंचे खांदे झुकले होते. यातून टीम इंडियाने सामना जवळजवळ सोडला, असेच दिसत होते. खरंतर कोणताही सामना कोण जिंकणार, कोण हरणार हे शेवटच्या चेंडूपर्यंत ठरतं. त्यामुळे चॅम्पियन संघासमोर देहबोली महत्त्वाची ठरते, हा धडा भारतीय संघाने घेतला पाहिजे.

Advertisement

हे ही वाचा >> Rohit Sharma : ‘खरं सांगायचं तर…’, रोहितने सांगितल्या चुका, कुणाला ठरवलं जबाबदार?

मोठ्या सामन्यांमध्ये प्रत्येक खेळाडूविरुद्ध हवी होती रणनीती

अंतिम सामन्यादरम्यान भारतीय संघाने आपले संपूर्ण लक्ष डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेलवर ठेवले होते, तर ऑस्ट्रेलियाकडे अनेक चॅम्पियन खेळाडू आहेत आणि त्यांच्यासाठी टीम इंडियाकडे कोणतीही योजना दिसली नाही. याचा फायदा घेत ट्रॅव्हिस हेड आणि लॅबुशेनने सामन्याचा निकालच बदलून टाकला. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघ प्रत्येक खेळाडूविरुद्ध पूर्ण नियोजन करून मैदानात उतरला होता.

अहमदाबादमधील वातावरण ओळखण्यात झाली चूक

भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाची सर्वात मोठी चूक ठरली, ती खेळपट्टीबद्दल चुकीचा अंदाज. अंतिम सामन्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी थोडी संथ आणि कोरडी ठेवण्यात आली होती. तर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने खेळपट्टीचे अचूक आकलन केले आणि नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

रोहित म्हणाला होता की, जर मी नाणेफेक जिंकली असती, तर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता. यातून हेच दिसते की रोहित आणि संघ व्यवस्थापनाला खेळपट्टी नीट समजून घेता आली नाही हे उघड आहे.

हे ही वाचा >> PM मोदी रोहित, कोहली, शमीला काय म्हणाले? ड्रेसिंग रूममधला संवाद आला समोर

दुसरीकडे, कमिन्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि जोस हेझलवुडसह कटर आणि स्लोअर बॉलिंगद्वारे भारतीय फलंदाजांना खूप त्रास दिला. यानंतर कांगारू संघ फलंदाजीला आला तोपर्यंत खेळपट्टी सपाट झाली होती. आउटफिल्डही वेगवान झाले होते. दव हे देखील एक मोठे कारण होते ज्यामुळे भारतीयांना गोलंदाजीत अडचणी येत होत्या.

कमी धावसंख्येच्या सामन्यांमध्ये कर्णधाराची भूमिका असते खूप निर्णायक

गोलंदाजी किंवा फलंदाजीत कर्णधार कसा बदल करतो हे खूप महत्त्वाचे आहे. एवढ्या मोठ्या स्पर्धेत निर्णय घेण्याच्या बाबतीत रोहित चुकीचा ठरला. तो अंदाज घेण्यात पूर्णपणे चुकला. या सामन्याचे विश्लेषण करणे आणि त्यातून शिकणे खूप महत्त्वाचे आहे. खर्‍या कर्णधाराची कसोटी फक्त कमी धावसंख्येच्या सामन्यांमध्ये जास्त असते, कारण पराभव तुमच्यासमोर असतो आणि तुम्ही तुमच्या रणनीतीने संपूर्ण खेळ फिरवू शकता.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज